मुंबई- कोरोना विषाणू विरोधाच्या लढाईत भारताने सर्व देशांना मदत केलीच पाहिजे. परंतु, प्राण वाचवण्यासाठी औषधे प्रथम भारतीयांना उपलब्ध करुन दिली पाहिजेत, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
मैत्री सूड उगवण्यासाठी नसते.. मात्र औषधे आधी भारतीयांना उपल्बध केली पाहिजेत - कोरोना विषाणू
मैत्री सूड उगवण्याबाबत नसते. भारताने सर्व राष्ट्रांना त्यांच्या आवश्यक वेळी मदत केलीच पाहिजे. परंतु, प्राण वाचवण्यासाठी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी राहुल गांधीनी ट्वीटरद्वारे केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात भारताने औषधांच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधे अमेरिकेला द्यावीत, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर भारताने 24 औषधं आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.