नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था, लॉकडाऊन, कोरोना परिस्थिती, चीन-भारत सीमा वाद यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच ‘ग्लोबल हंगर इंडेक्स'(जीएचआय) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी जागतिक कुपोषण निर्देशांकाचा ग्राफ टि्वटरद्वारे शेअर केला. मोदी सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिशे भरत आहे. म्हणून देशातील गरीब भुकने व्याकूळ झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
'मोदी खास मित्रांचे खिसे भरताय, म्हणून देशातील गरीब भुकेने व्याकूळ' - Rahul hits out at Modi over Global Hunger Index
राहुल गांधी यांनी जागतिक कुपोषण निर्देशांकाचा ग्राफ टि्वटरद्वारे शेअर केला. मोदी सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरत आहे. म्हणून देशातील गरीब भुकने व्याकूळ झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
जागतिक भूक निर्देशांक 2020 आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार इंडोनेशिया, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश हे भारताच्या तुलनेत चांगल्या स्थानी आहेत. इंडोनेशिया 70, नेपाळ 73, बांगलादेश 75 आणि पाकिस्तान 88 व्या स्थानावर आहे. यावर्षी 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. तर गेल्या वर्षी 2019 मध्ये भारत 117 देशांच्या यादीत 102 क्रमांकावर होता.
यापूर्वीही राहुल गांधींनी मोदींवर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकण्यावरून टीका केली होती. मोदी फक्त आपल्या मित्रांचे हित पाहत असून देशातील मुळ मुद्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. मोदींनी आपल्या काही खास मित्रांचे लाखो-कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असेही ते म्हणाले होते.