महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी झालीच नाही - महाधिवक्ता वेणूगोपाल - petitioner

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान मला अशी माहिती मिळाली होती की राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेली. संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक झाली ती चोरीला गेल्यामुळे नाही तर, मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्याने झाली, असा दावा त्यांनी केला आहे.

महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल

By

Published : Mar 8, 2019, 10:31 PM IST

नवी दिल्ली - राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेल्याचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. यानंतर सर्व विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले. आता वेणूगोपाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'चोरी झालीच नाही' असे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे मूळ गोपनीय कागदपत्रांच्या फोटोकॉपीज होत्या. गोपनीयतेचा भंग झाल्याचे न्यायालयाला सांगितल्याचे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान मला अशी माहिती मिळाली होती की राफेल करारासंबंधीची कागदपत्रे चोरीला गेली. संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक झाली ती चोरीला गेल्यामुळे नाही तर, मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्याने झाली, असा दावा त्यांनी केला आहे. संरक्षण मंत्रालयातून राफेल करारासंबंधीचे दस्तावेज चोरीला गेले नाहीत असे आता के. के. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

बुधवारी वेणुगोपाल यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, राफेल करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे हरवली आहेत. हे वक्तव्य समोर आल्यापासून विरोधक सरकारवर तुटून पडले होते. मात्र आता याचिकाकर्त्यांनी सदर कागदपत्रांच्या फोटोकॉपी कोर्टात सादर केल्या. ही कागदपत्रं हरवलेली नाहीत. तर, गोपनीयतेचा भंग झाला आहे, असा नवा दावा के. के. वेणुगोपाल यांनी केला. तसेच, मी यासंबंधीची माहिती दिलीच नाही व कागदपत्रे चोरीला गेल्याचे बोललोच नाही असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या राफेल करारासंबंधीच्या निर्णयाविरोधात वकील प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी याचिका दाखल केली होती. त्यात फोटोकॉपीजचा समावेश होता. त्या गोपनीय कागदपत्रांच्या फोटोकॉपीज होत्या. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला, हेच आपण बोललो होतो, असे आता वेणुगोपाल म्हणत आहेत. यामुळे आता कागदपत्रे चोरी झाली की लीक झाली, हा नवा प्रश्न समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

विरोधकांनी राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय घमासान सुरू झाले होते. त्यातच वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अचानकपणे कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगताच सर्वांनाच धक्का बसला होता. तसेच, वृत्तपत्रांमध्ये चोरीला गेलेल्या याच कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापून येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, हा गोपनीयता कायद्याचा भंग असल्याचा पवित्राही सरकारने घेतला होता. काँग्रेसने यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आणि राफेल प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र, के. के वेणुगोपाल यांनी आता ही कागदपत्रे चोरीला गेलीच नाहीत, असे म्हटले आहे.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details