राहुल गांधी यांचा राफेलवरून मोदींवर पुन्हा हल्ला - congress
केंद्र सरकारने राफेल प्रकरणी अपुरे पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणी पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी 'मोदींनी गरिबांचा पैसा अनिल अंबानींच्या खिशात टाकला,' असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
नवी दिल्ली - राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्यास तयार असल्याचे सांगितले. ही सुनावणी काही काळानंतर होईल, असेही सांगितले. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी आणि भाजपवर पुन्हा टीका केली आहे. 'चौकीदाराने चोरी केली आहे,' असे राहुल गांधींनी म्हटले आहे. अमेठीमधून उमेदवारीसाठी नामांकन दाखल केल्यानंतर राहुल यांनी मोदींवर टीका केली.
केंद्र सरकारने राफेल प्रकरणी अपुरे पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणी पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच, न्यायालयाने यावर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली होती. यानंतर राहुल गांधींनी 'मोदींनी गरिबांचा पैसा अनिल अंबानींच्या खिशात टाकला,' असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.