नवी दिल्ली - 'जय श्री राम,' 'वंदे मातरम,' 'अल्लाहू-अकबर'च्या जयघोषात लोकसभेत आजही नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी सुरू राहिले. यादरम्यान उपस्थित खासदारांकडून देशभक्तीच्या घोषणांसह धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. साक्षी महाराज, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, हेमामालिनी, शफीकुर्रहमान बर्क यांनी शपथ घेण्याआधी आणि शपथ घेतल्यानंतर घोषणा देण्यात आल्या. आज मेनका गांधी, अभिनेता रवि किशन, सोनिया गांधी यांनीही शपथ घेतली.
लोकसभेत शपथविधीनंतर 'जय श्री राम,' 'वंदे मातरम,' 'अल्लाहू-अकबर'चा जयघोष
'जय श्री राम,' 'राधे-राधे,' 'कृष्णम् वंदे जगद्गुरुम्,' 'वंदे मातरम,' 'भारतमाता की जय,' 'तकबीर,' 'अल्लाहू-अकबर,' 'जय भीम' असा जयघोष करण्यात आला. याशिवाय 'मंदिर वही बनायेंगे' अशाही घोषणा देण्यात आल्या.
'जय श्री राम,' 'राधे-राधे,' 'कृष्णम् वंदे जगद्गुरुम्,' 'वंदे मातरम,' 'भारतमाता की जय,' 'तकबीर,' 'अल्लाहू-अकबर,' 'जय भीम' असा जयघोष करण्यात आला. याशिवाय 'मंदिर वही बनायेंगे' अशाही घोषणा देण्यात आल्या.
भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. या वेळी साक्षी महाराजांनी भारतामाता की जय, जय जय श्री राम असा जयघोष केला. त्यांच्या शपथेनंतर 'मंदिर वही बनायेंगे' अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजपच्या मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी मथुरेत सहजपणे ऐकायला मिळणारा 'राधे-राधे,' 'कृष्णम् वंदे जगद्गुरुम्' असा जयघोष केला.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेतून शपथ घेतली. त्यांच्या शपथेआधी खासदारांनी 'जय श्री राम' म्हणत घोषणा दिल्या. त्यावर ओवेसींनी त्यांची चेष्टा करताना 'सुरू ठेवा, सुरू ठेवा' अशा प्रकारचे हातवारे केले. शपथेनंतर ओवेसी यांनी 'तकबीर,' 'अल्लाहू-अकबर' म्हणून 'जय हिंद' अशी घोषणा दिली.
शफीकुर्रहमान यांनी शपथ घेण्याआधी आणि शपथ घेतल्यानंतर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या शपथेआधी खासदारांनी 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या. बर्क यांनी शपथेनंतर 'जिथपर्यंत वंदे मातरमचा संबंध आहे, हे इस्लामच्या विरोधात आहे. आम्ही याचे अनुसरण करू शकत नाही,' असे म्हटले.