महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन ३.० : देशातील विविध भागांमध्ये दारु विक्री सुरू; दुकानांबाहेर पहाटेपासूनच लागल्या रांगा.. - wine and liquor shops opne

आज पहाटेपासूनच देशाच्या विविध भागांमधील दारुच्या दुकानासमोर मद्यपींच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लोक दारू खरेदी करताना दिसून येत आहेत.

Queue has been growing in front bars, as govt given permission to sell liquor
लॉकडाऊन ३.० : देशातील विविध भागांमध्ये दारु विक्री सुरू; दुकानांबाहेर पहाटेपासूनच लागल्या रांगा..

By

Published : May 4, 2020, 10:30 AM IST

नवी दिल्ली - देशभरात तिसरे लॉकडाऊन लागू झाले आहे. यामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये दारु विक्रीस सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच देशाच्या विविध भागांमधील दारुच्या दुकानासमोर मद्यपींच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लोक दारू खरेदी करताना दिसून येत आहेत.

  • दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरातील दुकानांबाहेर लोकांच्या रांगा दिसून आल्या..
  • छत्तीसगडच्या रायपूरमधील दुकानांबाहेरची दृश्ये..
  • कर्नाटकमधील दुकानांबाहेर अगदी देवदर्शनाला लागावी त्याप्रमाणे लोकांची रांग लागली होती..

आजपासून देशातील विविध भागांमधील व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. तर, दिल्लीमधील सरकारी आणि खासगी कार्यालयेही सुरू करण्याचे आदेश केजरीवाल यांनी दिले आहेत.

हेही वाचा :लॉकडाऊन काळात टाटा स्टीलकडून ई-लर्निंग कोर्सेसची सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details