नवी दिल्ली - देशभरात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनचाही सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानची बहिण कोमर मोहसिन शेख यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदींना राखी बांधली आहे. यावेळी कोमर यांच्या पतीने रेखाटलेले मोदींचे एक सुरेख चित्र ही त्यांनी मोदींना भेट दिले आहे.
मोदींची 'ही' पाकिस्तानची बहिण त्यांना दरवर्षी बांधते राखी
देशभरात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनचाही सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी कमर मोहसिन शेख दिल्लीत आल्या आहेत. मोहसिन शेख गेल्या 24 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी मोठे भाऊ म्हणून मला राखी बांधण्याची संधी मिळते. ते निरोगी, स्वस्थ राहोत आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी असेच काम करत राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
कमर मोहसिन शेख या पंतप्रधानांच्या मानलेल्या बहिण आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या अहमदाबाद येथे वास्तव्य करत आहे. पाकिस्तानमधील कराची सोडून त्या अहमदाबाद येथे येऊन राहू लागल्या. पंतप्रधान मोदी ज्यावेळी संघामध्ये प्रचारक होते. तेव्हापासून त्या मोदींना राखी बांधतात. गेल्या 24 वर्षापासून कमर मोहसिन शेख दिल्लीला येऊन नरेंद्र मोदींना राखी बांधतात आणि त्यांना ओवाळतात.