महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सावधान...! त्वचेतील 'हे' बदलही असू शकतात कोरोनाची लक्षणे

कोेरोनामुळे एकाच प्रकारचे व्रण त्वचेवर दिसत नाही तर वेगवेगळ्या प्रकराचे व्रण त्वचेवर दिसतात, असे संशोधनाचे प्रमुख एस्टर ई फ्रीमॅन यांनी सांगितले. संशोधकांनी 716 संशयित कोरोना बाधितांच्या त्वचासंबंधी लक्षणांची माहिती जमा केली. यातील 171 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 21, 2020, 6:22 PM IST

बोस्टन -जगभरात कोरोनाचे रुग्ण जसजसे वाढायला लागले आहेत. तसे कोरोना संसर्गाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडत आहे. कोरोनाची विविध लक्षणे अभ्यासातूून समोर येत आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या त्वचेत काय बदल होतात याबद्दला नुकताच एक अभ्यास समोर आला आहे. त्यानुसार तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, हे आणखी अचूकपणे ओळखता येणार आहे.

अमेरिकेतील मॅसाच्युसेट जनरल रुग्णालय आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी अमेरिकन अ‌ॅकेडमी ऑफ डर्मिटालॉजी आणि इंटरनॅशनल लीग ऑफ डर्मिटॉलॉजिक सोसायटीचे सहाय्य घेण्यात आले आहे. कोरोना झाल्यानंतर त्वचेसंबंधी कोणती लक्षणे आढळून येतात याची रजिस्ट्री संशोधकांनी बनवली आहे.

कोरोनामुळे एकाच प्रकारचे व्रण त्वचेवर दिसत नाही तर वेगवेगळ्या प्रकराचे व्रण त्वचेवर दिसतात, असे संशोधनाचे प्रमुख एस्टर ई फ्रीमॅन यांनी सांगितले. संशोधकांनी 716 संशयीत कोरोना बाधितांच्या त्वचासंबंधी लक्षणांची माहिती जमा केली. यातील 171 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता.

काय आहे त्वचेची लक्षणे?

ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यातील 22 टक्के रुग्णांमध्ये गोवार आजारात जसे त्वचेवर बारीक पुळ्या उठतात तशी लक्षणे दिसत होती. या सर्वांमध्ये कोरोनाचा संसर्ग मध्यम स्वरुपाचा होता.

दुसरे सर्वसामान्य त्वचेशी संबंधीत लक्षण म्हणजे लाल किंवा जांभळ्या रंगाच्या पुळ्या हाताची बोटे, टाचा आणि पायाच्या बोटांवर आढळून आल्या. विशेषता जे रुग्ण थंड हवेच्या संपर्कात आले त्यांच्यात ही लक्षणे दिसली. 18 टक्के रुग्णांमध्ये हे लक्षण दिसून आली. कोरोनाची इतर लक्षणे दिसून येत असतानाच त्वचेसंबंधी लक्षणेही दिसून आली. मात्र, 12 टक्के रुग्णांमध्ये आधी फक्त त्वचेशी संबंधीत लक्षणे दिसून आली.

ABOUT THE AUTHOR

...view details