महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाबात विषारी दारूमुळे 21 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचे कसून चौकशीचे आदेश - कॅप्टन अमरिंदर सिंह न्यूज

अमृतसर, बटाला आणि तरणतारण येथे कथितरीत्या विषारी दारूचे सेवन केल्यामुळे झालेल्या 21 मृत्यू झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

पंजाबात विषारी दारूमुळे मृत्यू
पंजाबात विषारी दारूमुळे मृत्यू

By

Published : Jul 31, 2020, 10:14 PM IST

चंदीगड - अमृतसर, बटाला आणि तरणतारण येथे कथितरीत्या विषारी दारूचे सेवन केल्यामुळे झालेल्या 21 मृत्यू झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची चौकशी विविध परिस्थितींमध्ये विविध मुद्द्यांशी जोडली गेली आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालंदरचे विभागीय आयुक्त, पंजाबचे संयुक्त अबकारी आणि कर आकारणी आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांद्वारे ही चौकशी केली जाणार असल्याचे समजले आहे.

मुख्यमंत्री सिंह यांनी जालंदरच्या आयुक्तांना या प्रकरणी कोणत्याही नागरी किंवा पोलिस अधिकऱ्याद्वारे वेगाने तपास करण्याची आणि प्रसंगी आवश्यक निर्णय घेण्याची सुविधा आणि स्वातंत्र्य दिले आहे. याप्रकरणी कोणी कट रचल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मृतांपैकी चार व्यक्तींचे शवविच्छेदन आज केले जाणार आहे.

या प्रकरणाची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली. '29 जूनच्या रात्री पीएस तरसिकामध्ये मुच्छल आणि टांगरा या गावांत विषारी दारू पिऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 30 जुलैच्या सायंकाळी आणखी दोन व्यक्तींचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले. एका व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,' असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details