महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुरक्षादलांना पूर्ण मोकळीक; पंतप्रधान म्हणाले, फक्त दिवस आणि वेळ सांगा - Jhansi

'सुरक्षा दलांना यापुढील कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. त्यांनी फक्त कारवाईचे स्वरूप, दिवस आणि वेळ सांगावी. भारत सरकार आणि जनता त्यांच्या पाठिशी आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी

By

Published : Feb 16, 2019, 3:32 PM IST

झाशी - 'दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके आणि पाठिराख्यांना पुलवामामध्ये सैतानी कृत्यांचे दर्शन घडविले आहे. त्यांचा हिशोब चुकता करण्यात येईल. सुरक्षा दलांना यापुढील कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. त्यांनी फक्त कारवाईचे स्वरूप, दिवस आणि वेळ सांगावी. भारत सरकार आणि जनता त्यांच्या पाठिशी आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ते झाशी येथे संरक्षण कॉरिडॉर उद्घाटनावेळी बोलत होते.

'आमचा विघ्नसंतोषी शेजारी देशाला त्यांचा रोजचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. तो जगात कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे. त्यांना कुणी दारातही उभे करून घेत नाही. पुलवामासारखे विनाशकारी कृत्य करून तो आम्हालाही त्यांच्यासारखेच लाचार आणि दयनीय बनवू इच्छित आहे. मात्र, त्यांचे हे मनसुबे धुळीला मिळविले जातील. त्यांचा हिशोब चुकता केला जाईल. आमचा शेजारी देश विसरत आहे, की हा नवी रीत आणि नवी नीती अवलंबलेला भारत आहे. पुलवामा घटनेला जबाबदार असेलल्या गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल,' असे मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले.

'पाकिस्तानने हेही लक्षात घ्यावे की, त्यांनी अवलंबलेल्या मार्गामुळे त्यांचेच नुकसान आणि पतन होत आहे. भारताने जो मार्ग अवलंबला आहे, त्यामुळे देशाची प्रगती झाली आहे. भारताचा विकास आणि उत्कर्ष संपूर्ण जग पाहात आहे. भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देईल. आज भारताला संपूर्ण जगभरातून समर्थन मिळत आहे. भारत बदलला आहे. परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तान भारताला अस्थिर करू शकत नाही. आम्ही सुरक्षादलांना कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे,' असे ते पुढे म्हणाले.


‘आज देश अत्यंत उद्विग्न आणि दुःखी आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी जो भेकड त्याविरोध संपूर्ण देश प्रक्षुब्ध आहे. देशाच्या आक्रोशाला मी सांगू इच्छितो की आपल्या वीरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. हा झाशीची राणी मणिकर्णिकेचा देश आहे.' असे मोदी म्हणाले.


पंतप्रधानांनी झाशीमध्ये संरक्षण कॉरिडॉरचे उद्घाटन केले. 'आता बुंदेलखंडाला देशाच्या सुरक्षा आणि विकासाचा कॉरिडोर बनवण्यात येत आहे. झाशीहून आग्र्यापर्यंत तयार होत असलेल्या कॉरिडोरमुळे देशाला मजबूती मिळणार आहे. तसेच, बुंदेलखंड आणि उत्तर प्रदेशातील युवकांना रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध होतील,' असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details