महाराष्ट्र

maharashtra

जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने; यासिन मलिकला सोडण्याची मेहबूबा मुफ्तींची मागणी

By

Published : Apr 24, 2019, 5:58 PM IST

'यासिन मलिक खरोखरच आजारी असल्यास त्याला ताबडतोब सोडून देण्यात यावे. तसेच, जमात-ए-इस्लामीच्या इतर नेत्यांनाही मुक्त करावे. विविध चकमकींनतर दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आहे. आम्ही यासाठी निदर्शने करत आहेत,' असे मुफ्ती यांनी सांगितले.

मेहबूबा मुफ्ती, यासिन मलिक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला सोडण्याची मागणी केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये आज निदर्शने करण्यात आली.


'यासिन मलिक खरोखरच आजारी असल्यास त्याला ताबडतोब सोडून देण्यात यावे. तसेच, जमात-ए-इस्लामीच्या इतर नेत्यांनाही मुक्त करावे. विविध चकमकींनतर दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आहे. तसेच, नियंत्रण रेषेपलीकडे मुझफ्फराबादशी चालणारा व्यापार थांबवण्यात आला आहे. आठवड्यातील २ दिवस राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येत आहे. सुरक्षा दले लोकांच्या दैनंदिन कार्यात हस्तक्षेप करत आहेत. आम्ही या सर्व बाबींविरोधात निदर्शने करत आहेत,' असे मुफ्ती यांनी सांगितले.


दिल्लीच्या पटिला हाऊस कोर्टाने यासिन मलिक याला २४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याच्यावर २०१७ मधील दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणे आणि दहशतवादी कट रचणे याच्यात सहभाग असल्यावरून अटक करण्यात आली आहे. राज्यात ५ टप्प्यांत निवडणुका होत आहेत. ६ मे रोजी ५ वा टप्पा पूर्ण होईल. २३ मे रोजी मतमोजणी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details