नवी दिल्ली -कृषी कायद्याविरोधात देशभरातून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच कर्नाटकमध्ये विविध शेतकरी संघटनांनी कृषी उत्पाद बाजार समिति (एपीएमसी) आणि भूमी सुधार कायद्यामध्ये येडीयुरप्पा सरकारद्वारे करण्यात आलेल्या सुधारणेविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचाही विरोध केला.
आंदोलनादरम्यान दिल्लीतील इंडिया गेटजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक ट्रॅक्टर पेटवल्याची घटना घडली आहे. तसेच केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि केवळ मुठभर भांडवलदारांचे हित साधण्यासाठी हा कायदा आणला आहे. शेतकऱ्या देशाचा कणा असून त्याला आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने केंद्र सरकारला या कृषी एमएसपी कायद्याविरोधात दिला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही रविवारी सायंकाळी कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वाक्षरी केली. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये, अशी विनंती विरोधी पक्षांनी केली होती.