महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सत्याचा एकच शब्द बंदुकीच्या गोळीसारखा', प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल - कन्नन गोपीनाथ

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

प्रियंका गांधीं

By

Published : Aug 26, 2019, 6:14 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी राजीनामा दिला. त्यामुळे प्रियंका गांधींनी पोलंडचे लेखक टेश्वाथ मिवोश यांचे एक वाक्य लिहून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


'जेव्हा एखाद्या खोलीमध्ये सर्व लोक सहमतीने गप्प बसण्याचे षडयंत्र करतात. तेव्हा तिथे सत्याचा एकच शब्द बंदुकीच्या गोळीसारखा आवाज करतो', असे 8 डिसेंबर 1980 मध्ये पोलंडमधील कवी आणि लेखक टेश्वाथ मिवोश यांनी लिहले होते, असे टि्वट प्रियंका गाधींनी केले आहे.


भारतीय प्रशासक सेवा अधिकारी कन्नन गोपीनाथ मुळचे केरळचे आहेत. कन्नन सध्या दादरा आणि नगर हवेली येथे ड्युटीवर होते. 'लोकांचा आवाज बनण्यासाठी मी नागरी सेवामध्ये रुजू झालो. मात्र सेवेत आल्यापासून माझाच आवाज बंद करण्यात आला आहे. मला माझे स्वातंत्र्य परत हवे आहे', असे कन्नन यांनी म्हटले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


प्रियंका गांधी टि्वटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. रविवारी विमानात काश्मीरी महिलेनं राहुल गांधींना आपले दु:ख सांगतिले होते. त्या घटनेचा व्हिडिओ शेअर करत 'राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मिरींना दडपले जातेय. हे असे किती दिवस सुरू राहणार? यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही असू शकत नाही', असे ट्विट प्रियांका गांधींनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details