नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश सरकार आणि राज्य पोलिसांनी आंदोलकांवर बेकायदेशीर कारवाई करत राज्यामध्ये अराजकता पसरवली आहे. भगवा रंग फक्त तुमचा नसून देशाच्या धार्मिक आस्थेचे प्रतिक असल्याचे प्रियांका म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने राज्यापालची भेट घेऊन त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी निवेदन दिल्याची माहिती प्रियांका गांधी यांनी दिली. 'माझ्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा नसून जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यावर चर्चा होणे गरजेची आहे. काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यात सीएए लागू होऊ देणार नाहीत. तसेच हिंसा आणि तोडफोड करणारी लोक कोण आहेत. याची तपासणी निवृत न्यायाधीश यांच्याकडून करण्यात यावी', असे प्रियांका गांधी म्हणाल्या. योगी आदित्यनाथ भगव्या रंगाचे कपडे घालतात. तो भगवा रंग फक्त तुमचा नाही. भगवा रंग देशाच्या धार्मिक आस्थेचा प्रतिक आहे. त्यांनी या रंगाचे महत्व समजून घ्यायला हवे. आपल्या देशाच्या पंरपरेमध्ये सूडबुद्धी आणि हिंसेला स्थान नाही. मात्र मुख्यमंत्री सुडबुद्धीचे राजकारण करत आहेत, असे त्या म्हणाल्या. बिजनौरमध्ये 2 लहाण मुलांचा मृत्यू झाला. एक मुलगा घराच्या बाहेर काँफी मशीन चालवत होता. तर दुसरा मुलगा दूध घेण्यासाठी बाहेर गेला होता. दोन्ही मुलांची हत्या करण्यात आली. तसेच दारापूरीमध्ये 77 वर्षीय निवृत अधिकारीला फेसबूकवर पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अनेक लोकांना तुरुंगामध्ये डांबल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या.