महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रक्षाबंधन : प्रियंका गांधी म्हणतात... राहुल जगातील सर्वश्रेष्ठ भाऊ! - छायाचित्र

आज देशभरात स्वातंत्र्य दिनाबरोबरच रक्षाबंधन उत्सवही साजरा केला जात आहे.

रक्षाबंधन : प्रियंका गांधींनी बालपणीचे छायाचित्र केला शेअर, म्हणाल्या... 'राहुल जगातील सर्वश्रेष्ठ भाऊ'

By

Published : Aug 15, 2019, 8:15 PM IST

नवी दिल्ली - आज देशभरात स्वातंत्र्य दिनाबरोबरच रक्षाबंधनचा सणही उत्सहात साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी वाड्रा यांनीही रक्षाबंधनानिमित्त जुन्या आठवणी उजाळा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला भाऊ राहुल गांधी यांच्यासोबतचे एक बालपणीचे छायाचित्र शेअर केले आहे.

प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचे एक बालपणीचे छायाचित्र शेअर केले आहे.


'@ राहूल गांधी मला वाटते की गोष्टी तितक्याही बदललेल्या नाहीत, नाही का..? तु जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस!', असे टि्वट प्रियंका यांनी केले आहे. हे छायाचित्र दोघांच्याही बालपणीचे आहे.

प्रियंका गांधी वाड्रा यांनी टि्वट केले आहे.


लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या निर्णयाचे प्रियंका गांधी यांनी समर्थन केले होते. असा निर्णय घ्यायला धाडस लागते, माझा या निर्णयाला पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.


रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.

ABOUT THE AUTHOR

...view details