प्रियांका गांधींनी ५ फूट उंचीच्या बॅरिकेडसवरून उडी मारून घेतली महिलांची भेट, मोदी समर्थकांशी केले हस्तांदोलन - ratlam
मध्य प्रदेशात प्रियांकांनी प्रथम उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी रतलाम आणि इंदूर येथे 'रोड शो' केला. रतलाम येथील सभा संपल्यानंतर त्या महिलांना भेटण्याासाठी बॅरिकेडसवरून उडी मारून निघाल्या. सुरक्षारक्षक येण्याआधीच त्या गर्दीत घुसल्या. त्यांनी महिलांशी हस्तांदोलन केले.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा सोमवारी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. रतलाम येथील सभा संपल्यानंतर त्या महिलांना भेटण्याासाठी निघाल्या. महिलाही मोठ्या उत्साहात होत्या. मात्र, सुरक्षेसाठी लावण्यात आलेले ५ फूट उंचीचे बॅरिकेडस मध्ये होते. ते लगेच उघडता येणे शक्य नव्हते. तेव्हा महिलांचा उत्साह पाहून त्यांनी या बॅरिकेडसवरून उडी मारली.
मध्य प्रदेशात त्यांनी प्रथम उज्जैनमध्ये महाकाल दर्शन घेतले. तेथून त्या रतलाम आणि त्यानंतर इंदूर येथे 'रोड शो' केला. रतलाम येथील सभा संपल्यानंतर त्या महिलांना भेटण्याासाठी बॅरिकेडसवरून उडी मारून निघाल्या. सुरक्षारक्षक येण्याआधीच त्या गर्दीत घुसल्या. त्यांनी महिलांशी हस्तांदोलन केले. याशिवाय, त्यांनी मोदी समर्थकांशीही अनोख्या पद्धतीने हस्तांदोलन केले.
प्रियांका विमानतळावरून निघाल्या असताना रामचंद्र नगर चौकाजवळ काही लोक 'मोदी-मोदी' अशा घोषणा देऊ लागले. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. प्रियांका या हूटिंगमुळे नाराज झाल्या नाहीत. तर, हे दृश्य पाहून प्रियांका यांनी स्वतःचा ताफा थांबवला. त्या कारमधून उतरल्या. त्यांनी सर्व लोकांशी हस्तांदोलन केले. 'तुम्ही तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी' असे प्रियांका यांनी त्या लोकांना म्हटले. यावर मोदी समर्थकांनी त्यांना 'व्हेरी गुड' ने म्हटले. यावर प्रियांका यांनीही हसून त्यांना 'ऑल द बेस्ट' म्हटले. त्यानंतर त्या तिथून रवाना झाल्या.