नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हाधिकारी आमच्यावर दबाव टाकत असल्याचा पीडित कुटुंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी प्रियांका गाधी यांनी आज टि्वट करत संबधित जिल्ह्याधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच यूपी सरकार झोपेतून जागे झाले असले. तर पीडित कुटुबांचे दु:ख त्यांनी ऐकावे, असे त्या म्हणाल्या. तथापि, शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गाधी यांनी हाथरस पीडित कुटुबांची भेट घेतली होती.
हाथरसच्या पीडित कुटुंबाप्रती सर्वात वाईट वागणूक डीएमची होती. त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? त्यांना उशीर न करता काढून टाकले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणात त्याच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर आता एसआयटी चौकशी का सुरू आहे. जर यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर त्यांनी कुटुंबाचे ऐकावे, असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले आहे.