महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजपने देशाचा खजिना रिकामा केला' - priyanka gandhi slammed modi

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींनी देशाचाच खजिना रिकामा केला आहे', असे प्रियांका यांनी टि्वट केले.

प्रियांका
प्रियांका

By

Published : Jan 13, 2020, 1:19 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'मोदींनी देशाला चांगले दिवस दाखवण्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी देशाचाच खजिना रिकामा केला आहे', असे प्रियांका यांनी टि्वट केले.

'भाजपने निवडणुकांपूर्वी चांगल्या दिवसांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी देशाचाच खजिना रिक्त केला आहे. एककिडे भाजप देशाचा खजिना काही भांडवलदारांना देत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगार आणि पोटा-पाण्याच्या व्यवसायावर हल्ला करत आहे', असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले. प्रियांका गांधी ह्या टि्वटवर विविध मुद्यांवर व्यक्त होतात. टि्वटच्या माध्यमातून केंद्र आणि मोदी सरकावर टीका करताना त्या पाहायला मिळाल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि अर्थव्यवस्थेवरून त्या भाजपला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करतात. यापुर्वी भाजप प्रचारामध्ये सुपरहिरो आहे. मात्र वास्तवामध्ये काम सुपर झीरो आहे. लोक भुकेने मरत आहेत. देशामध्ये महागाई वाढली असून सरकार देशातील सार्वजनिक कंपन्या विकत असून भाजप सरकार देशातील समस्या सोडण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details