प्रतापगढ - नरेंद्र मोदींसारखा भित्रा आणि कमजोर पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले. जनतेला मोठे मानणे हीच राजकीय ताकद असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच हे पंतप्रधान जनतेच्या प्रश्नांची उत्तरेही देत नसल्याचे त्या म्हणाल्या.
मोदींसारखा भित्रा आणि कमजोर पंतप्रधान आजपर्यंत बघितला नाही, प्रियंका गांधींचा निशाणा - comment
नरेंद्र मोदींसारखा भित्रा आणि कमजोर पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले. जनतेला मोठे मानणे हीच राजकीय ताकद असल्याचेही त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे आयोजित प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या.
उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे आयोजित प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. राजकीय ताकद ही मोठ-मोठ्या सभांमधून येत नाही. टीव्हीवर सारखे दिसल्याने येत नाही. जनतेचे प्रश्न ऐकूण घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे, विरोधी पक्षांचे मुद्दे ऐकणे हीच खरी राजकीय ताकद असल्याचे गांधी म्हणाल्या. मात्र, हे पंतप्रधान जनतेच्या प्रश्नांची उत्तरेही देत नसल्याचे म्हणत प्रियंका गांधींनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.