महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरकारने अर्थव्यवस्थेचे टायर पंक्चर केले; प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

प्रियंका गांधी

By

Published : Aug 31, 2019, 7:31 PM IST

नवी दिल्ली -देशात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवरकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'चांगल्या दिवसांचा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्थेचे टायर पंक्चर केले आहे', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा -जन्मदात्रीनेच मुलीच्या इच्छा मरणाची केली राज्यपालांकडे मागणी..


'भारताच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) घट झाली आहे. यामधून स्पष्ट होते की, चांगल्या दिवसांचा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्थेचे टायर पंक्चर केले आहे. जीडीपीत वाढ झाली नसून रुपया घसरला आहे. तर रोजगारदेखील गायब आहेत. आता तरी सांगा की अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा हा कारनामा कोणाचा आहे? असे म्हणत प्रियंका गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा -लेखिका अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 'गुगल'चे खास 'डूडल'


गेल्या सात वर्षात प्रथमच एप्रिल-जूनदरम्यान जीडीपीचा नीचांक नोंदविण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनदरम्यान ४.९ टक्के जीडीपी नोंदविण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ८ टक्के जीडीपीची नोंद झाली होती.

आरबीआयने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी हा ७ टक्के राहील, असा अंदाज जूनच्या तिमाहीदरम्यान वर्तविला होता. यामध्ये बदल करून जीडीपी हा ६.९ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details