नवी दिल्ली - येत्या २१ जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदींचे ३डी कार्टुन शालभासन कसे करायचे हे दाखवत आहे.
जागतिक योग दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी ट्विटरवर शेअर केला योगासनाचा व्हिडिओ - व्हिडिओ
व्हिडिओमध्ये मोदींच्या ३डी कार्टूनने निळा टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. मोदींचे हे कार्टून योगा करताना याचे फायदेही सांगत आहे.
व्हिडिओमध्ये मोदींच्या ३डी कार्टूनने निळा टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. मोदींचे हे कार्टून योगा करताना याचे फायदेही सांगत आहे. शलाभासन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि पचनसंस्था सुधारते तर, पाठदुखी आणि सायटीकाच्या रुग्णांना हे आसन लाभदायी आहे, अशी माहिती दिली जात आहे. यामध्ये, गर्भवती महिला, पोटदुखी असणारे रुग्ण, हर्निया आणि ह्रदयरोग असलेल्या लोकांनी हे आसन करू नये, असे सांगण्यात आले आहे.
मोदींनी ट्विटरवर व्हिडिओसोबत लिहिले आहे, की मजबूत सांधे, पाठदुखीपासून आराम आणि स्पॉन्डिलायटीस यांच्यापासून आराम मिळण्यासाठी शालभासना उपयुक्त आहे. मोदी ५ जूनपासून ट्विटरवर योगाचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. मोदींच्या संयुक्त राष्ट्रात दिलेल्या भाषणानंतर २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. यादिवशी जगभरात योग दिवस उत्साहाने साजरा केला जातो.