नवी दिल्ली - करोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. यासाठीच देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तो उद्या म्हणजेच 14 एप्रिलला संपत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशवासीयांना करणार संबोधित - pm narendra modi address the nation
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
pm modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.