महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पैसा हजम परियोजना खतम, हाच विरोधकांचा मंत्र', प्रचार सभेत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - बिहार विधानसभा निवडणूक लेटेस्ट न्यूज

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा येथे प्रचार सभेला संबोधीत केले. मतदान करताना सोशल डिस्टन्सिंग पाळत मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. 'पैसा हजम परियोजना खत्म', असा त्यांचा मंत्र होता, असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Oct 28, 2020, 12:48 PM IST

Updated : Oct 28, 2020, 1:36 PM IST

पाटणा -बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरवात झाली आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा येथे प्रचार सभेला संबोधित केले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले. या सभेत मोदींनी विरोधकांवर टीकाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींच्या भाषणातील मुद्दे -

  • एनडीए सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात सरळ मदत केली. जवळपास एक लाख कोटी रुपयांची मदत देशातील शेतकऱ्यांना केली आहे. तसेच जवळपास 40 कोटींपेक्षा लोकांची खाती उघडली आहेत. तसेच उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून बिहारमधील 90 लाख महिलांना ग‌ॅस उपलब्ध करून दिला. तसेच गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोय करून दिली.
  • एनडीएने बिहारला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला आहे. तर दुसरीकडे जनतेच्या पैशांवर त्यांची (विरोधी पक्ष) नजर आहे, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. 'पैसा हजम परियोजना खतम', असा त्यांचा मंत्र होता. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यातही घोटाळा केला. हे लोक कधीच बिहारच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले.
  • कोरोना संकटकाळात गरिबांना धान्य मोफत दिले. बिहारमध्ये एम्स उभारण्यात येत असून गरिबांना याचा फायदा होईल. एम्सच्या उभारणीसाठी 1200 कोटी रुपये खर्च लागत आहेत. तसेच मिथिलांचरमध्ये पर्यटन विकास करण्यात येणार आहे.
  • 2003 मध्ये नितिश कुमार रेल्वे मंत्री होते. तेव्हा त्यांनी महासेतूची मागणी केली. त्यानंतर अटल बिहारी वायपेयी यांनी महासेतूला परवानगी दिली.

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात -

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील दरभंगानंतर मुजफ्फरपूर आणि पाटण्यात सभा घेणार आहेत. बिहारमध्ये पहिल्या टप्प्पयातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये 1 हजार 66 उमेदवारांचे नशीब मशीनबंद होणार आहे. तर 14 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

Last Updated : Oct 28, 2020, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details