संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांनी आयोजित केलेल्या हवामान आणि जागतिक आरोग्य विषयक परिषदेत सहभाग नोंदवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एकाच मंचावर बसून ते विविध विषयांवर चर्चा करताना दिसून येतील.
मोदींचा भारताचे पंतप्रधान या नात्याने हा अमेरिकेचा चौथा अधिकृत दौरा आहे. येत्या काही दिवसांमध्ये मोदी न्यूयॉर्क आणि उर्जेची राजधानी मानल्या जाणाऱ्या ह्यूस्टन या दोन शहरांना भेट देणार आहेत. भारत अंदाजे 4 अब्ज डॉलर्स किमतीचे तेल आणि गॅस अमेरीकेकडून आयात करतो. पंतप्रधान मोदी यावेळी, गुंतवणूक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये संभाव्य संधींबाबत अमेरिकेच्या उर्जा कंपन्यांशी संवाद साधतील, अशी माहिती, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. रविवारी(22 सप्टेंबर) पंतप्रधान मोदीं ट्रम्प यांच्यासह बहुप्रतिक्षित अशा 'हाऊडी, मोदी!' या कार्यक्रमात सहभागी होतील. जवळजवळ 50000 इंडो-अमेरिकन लोक या कार्यक्रमासाठी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाविषयी बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर म्हणतात, “आज अमेरिकी राष्ट्रध्यक्षांच्या उपस्थितीत इतका मोठा कार्यक्रम आयोजित होत असेल तर, ही भारतीय-अमेरिकन समुदायासाठी एक मोठी उपलब्धी आहे"
हेही वाचा -काश्मीरमध्ये निर्बंध आणि राजकीय वावर कमी करण्याचा अमेरिकेचा आग्रह
सोमवारी(23 सप्टेंबर) पंतप्रधान मोदी 2015 नंतर दुसऱ्यांदा हवामान बदलासंबंधीत परिषदेला संबोधित करतील. यावेळी, भारताची विकास लक्ष्ये, आकांक्षा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताच्या अपेक्षा हे पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे असणार आहेत. याव्यतिरीक्त, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्राच्या ईमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवुन तयार करण्यात येणाऱ्या गांधी सौर उद्यानाचे उद्घाटन, टपाल तिकिटाचे अनावरण आणि ओल्ड न्यूयॉर्क परीसरातील स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पमधील गांधी पीस गार्डनचे उद्घाटन अशआ विविध कार्यक्रमांना मोदी हजेरी लावणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे 'ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी मोदी ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरमच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण करतील. तसेच, ते वनउद्येजकांसोबत संवाद साधतील.
हेही वाचा -पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून
27 सप्टेंबरला 2014 नंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी महासभेला संबोधित करतील. यावेळी, दहशतवाद, जागतिक राजकारणातील सुधारणा आणि बहुपक्षीयतेचे आवाहन या विषयांवर मोदी लक्ष केंद्रीत करू शकतात. पंतप्रधान मोदींनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या महासभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या भाषणात ते, भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबद्द वक्तव्य करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- स्मिता शर्मा, वरिष्ठ पत्रकार, परराष्ट्र व्यवहार