महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मन की बात : सप्टेंबर 'पोषण महिना' म्हणून होणार साजरा... - modi interacts with the nation in mann ki baat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधला.

मन की बात
मन की बात

By

Published : Aug 30, 2020, 12:33 PM IST

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना, भारतीय कृषी कोष, पोषण महिना, लॉकडाऊन, भारतीय खेळ आदी विषयांवर भाष्य केलं. याआधी त्यांनी 18 ऑगस्टला या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांकडून काही सूचना , कल्पना मागविल्या होत्या. पंतप्रधान मोदींचा आज मन की बात हा 68 वा कार्यक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

कोरोना संकटात नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव असून त्यांच्यामध्ये संयम आणि अनुशासन आहे. देशात होत असलेले उत्सव अगदी संयमाने आणि साधेपणाने होत असून हे अभूतपूर्व आहे.

येत्या 5 स्पटेंबरला देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येईल. शिक्षकांसमोर आलेली आव्हाने त्यांनी पेलली आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून नवनिर्माण करत आहेत. देशाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील.

सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. बालकांच्या स्वस्थतेसाठी आईलाही पोषण मिळण्याची गरज लोह, कॅल्शियम या सर्व गोष्टी स्वस्थ पोषणाचा एक भाग आहे. तसेच मोदींनी चिल्ड्रन युनिव्हर्सिटीचे कौतुक केले.

देशाला स्थानिक खेळण्यांची मोठी परंपरा आहे, आपल्याकडची अऩेक ठिकाणे खेळण्याचे उद्योग म्हणून विकसित होत आहेत. जागतिक खेळ साहित्याचा उद्योग 7 लाख कोटींचा आहे. पण त्यात भारताचा हिस्सा कमी आहे. त्यामुळे स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पर्यावरण अनुकुल खेळण्यांना प्राधान्य द्यावे. देशाचा इतिहास, परंपरा संस्कृतीला ध्यानात घेऊन गेम तयार करावे.

देशात भारतीय कृषी कोष तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात पिकत असलेल्या पिकांची माहिती दिली जाणार आहे. शेतकरी बांधवांनी करोनाच्या या कठीण परिस्थितीतही आपले सामर्थ्य सिद्ध केल्याने मोदींनी शेतकऱ्यांच्या श्रमाला नमन केले.

देशाच्या सुरक्षेत योगदान देणाऱ्या श्वानांचे मोदींनी कौतुक केले. तसेच स्वतंत्र चळवळीत योगदान देणाऱ्या स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांवर लक्ष केंद्रित करण्याचे मोदींनी आवाहन केले. तसेच सर्व देशवासियांनी स्वस्थ, तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. सर्वांनीमास्क, सुरक्षित शारीरिक अंतर नियमांचे पालन करावे.

ABOUT THE AUTHOR

...view details