नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, मोदी ६६ व्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. यात ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या मन की बातमध्ये, २० लाख कोटींचे पॅकेज, लॉकडाऊनचा पुढचा टप्पा, आत्मनिर्भर भारत या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. असे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शवरुन प्रसारित केला जाणार आहे. तसेच याचे लाईव्ह प्रसारण पीएमओ ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, डीडी न्यूज आणि यूट्यूब चॅनल एअरवरूनही केले जाणार आहे.
कोरोना विषयावर मागील वेळी मन की बातमध्ये बोलताना मोदी यांनी, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन केले होते.