महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी लष्कराचेच अपत्य, १०० तासांच्या आत केला कमांडरचा खात्मा' - attack

जैश-ए-मोहम्मद हे पाकिस्तानी लष्कराचेच अपत्य असल्याचे लष्कर प्रमुखांनी म्हटले आहे. हल्ले करणारे किती तरी गाझी आले आणि गेले. मात्र, या सर्वांचा आम्ही खात्मा केल्याचे लष्कराने म्हटले आहे.

Army

By

Published : Feb 19, 2019, 1:44 PM IST


श्रीनगर - आज लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन काश्मीरमधील परिस्थितीबाबत माहिती दिली. गुरुवारी जैश-ए-मोहम्मदने घडवलेल्या हल्ल्याचे आम्ही १०० तासांच्या आत प्रत्युत्तर दिले आहे, असा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत केला.


जैश-ए-मोहम्मद हे पाकिस्तानी लष्कराचेच अपत्य असल्याचे लष्कर प्रमुखांनी म्हटले आहे. हल्ले करणारे किती तरी गाझी आले आणि गेले. मात्र, या सर्वांचा आम्ही खात्मा केल्याचे लष्कराने म्हटले आहे. बंदुक उचलेल्या तरुणांनी माघारी परतावे नाहीतर ठार मारू, असा इशाराच यावेळी लष्कराने दिला.

काश्मीर खोऱ्यातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवादाच्या मार्गाने भरकटलेल्या तरुणाईने आत्मसमर्पण केले नाही तर आम्ही त्यांना ठार मारू, असे कनवालजीत सिंग धिल्लान यांनी सांगितले. लष्कराने प्रत्युत्तरात राबवलेल्या मोहिमेत पाच जवानांना वीरमरण आले. तसेच जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे ते म्हणाले. यात पलवामा आत्मघातकी बॉम्बहल्ल्याचा मुख्य सूत्रधार कामरानचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिल अहमद दारला त्यानेच प्रशिक्षण दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details