नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कोविंद यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान केला. यावर्षी पद्म पुरस्कारासाठी ११२ लोकांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रपतींनी ११ मार्चला एक पद्मविभूषण, ८ पद्म आणि ४६ पद्मश्री पुरस्काराचे वितरण केले होते.
महाराष्ट्रातील सय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. शब्बीर यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शब्बीर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात गो-शाळा चालवितात.
लोकगायिका तीजन बाई यांना'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. एमडीएचचे कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.
यासह अनेक मान्यवरांचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
'पद्मश्री' प्राप्त मान्यवर -
- बछेंद्री पाल - गिर्यारोहण
- मनोज वाजपेयी - अभिनय
- स्वप्न चौधरी - कला, संगीत
- सुनील छेत्री - फुटबॉल
- बोम्बायला देवी लैशराम - तिरंदाजी
- गौतम गंभीर - क्रिकेट
- एच.एस.फुलका - पब्लिक अफेअर
- प्रशांती सिंह - बास्केटबॉल
- डी. प्रकाश राव - समाजसेवा