गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनावर राष्ट्रपतींचा शोकसंदेश - goa cm
'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आजाराशी दृढतेने लढताना निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. सार्वजनिक जीवनातील एकात्मता आणि समर्पणाचे ते प्रतीक होते. गोवा आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या सेवा कधीही विसरता येणार नाहीत,' असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आजाराशी दृढतेने लढताना निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. सार्वजनिक जीवनातील एकात्मता आणि समर्पणाचे ते प्रतीक होते. गोवा आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या सेवा कधीही विसरता येणार नाहीत,' असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही पर्रीकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी शोकसंदेशांसह गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आदरांजली वाहिली.