महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राफेलसह अपाचे हेलिकॉप्टर लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात होणार दाखल - राष्ट्रपती

भारतीय सेना आणि सशस्त्र बलांच्या आधुनिकीकरणासाठी राफेल विमान आणि अपाचे हेलिकॉप्टर यांचा लवकरच समावेश होवू शकतो, असे राष्ट्रपतींनी अभिभाषणात म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By

Published : Jun 20, 2019, 4:49 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दोन्ही संसदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी भविष्यात भारत सरकारचा कशावर भर राहिल आणि आगामी काळात देश किती प्रगती करणार, याचा उल्लेख त्यांनी अभिभाषणात केला. भारतीय सेना आणि सशस्त्र बलांच्या आधुनिकीकरणासाठी राफेल विमान आणि अपाचे हेलिकॉप्टर यांचा लवकरच समावेश होवू शकतो, असेही राष्ट्रपतींनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, सरकारच्या मेक इन इंडिया या योजनेत आधुनिक शस्त्र बनवण्यावर विशेष भर दिला जात आहे. आधुनिक राफेल विमान, तोफ, टँक, लढाऊ जहाज भारतातच बनवण्याच्या उद्देशाला यशस्वीपणे पुढे नेले जात आहेत. उत्तरप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांना यामुळे मजबूती मिळणार आहे. भारताच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करताना सुरक्षासबंधीत उपकरणे निर्यात करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वीरमरण आलेल्या जवानांचा सन्मान केल्यामुळे सैनिकांमध्ये आत्मगौरव आणि उत्साहाचा संचार होतो. यामुळे आपले सैन्य मजबूत होते. यामुळे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न केला जाईल. वन रँक वन पेन्शनमध्ये वाढ करुन त्यांच्या आरोग्याचा आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा विस्तार करुन त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

वीरजवानांबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले, दिल्लीत इंडिया गेटजवळ 'नॅशनल वॉर ममोरिअल' वीरमरण आलेल्या जवानांच्याप्रती राष्ट्राची विनम्र श्रद्धांजली आहे. याप्रकारेच देशाची सुरक्षा करताना वीरमरण आलेल्या पोलिसांसाठी नॅशनल पोलीस ममोरिअलची निर्मिती करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details