नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कौतूक केले. राम मंदिर, चीनबरोबरचा गलवान खोऱ्यातील संघर्ष, कोरोना काळात राबविण्यात आलेल्या सरकारच्या योजना आणि नव्या शिक्षण धोरणाचा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
कोरोना प्रसारामुळे या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सोहळा थाटामाटात साजरा करण्यात येत नाही. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अथक परिश्रम केले असून अजूनही प्रयत्न सुरु आहेत. आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. कोरोना संकटात जनतेचे जीवन आणि जीवनचरिथार्तावर लक्षं देण गरजेचे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना सलाम
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात चीनच्या आक्रमक धोरणाचा उल्लेख करत गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम केला. संपूर्ण जगाने एकत्र येऊन कोरोना विषाणूचा सामना करण्याची गरज असताना शेजारी देशाने विस्तारवादी धोरण स्वीकारले आहे. आपल्या शूर सैनिकांनी बलिदान देत सीमांचे रक्षण केले. जवान भारत मातेच्या अभिमानासाठी जगले आणि शहीद झाले. भारताचा शांततेवर विश्वास आहे. मात्र, जर कोणी आक्रमक भूमीक स्वीकारली तर देश चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, असे राष्ट्रपती म्हणाले.
राम मंदिर देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण