नवी दिल्ली -काही दिवसांतच दिल्लीसह देशभरात टायर असलेल्या ट्रेनमधून प्रवास करायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात या मेट्रो रेल्वेचा उपक्रम राबवण्यासाठी मोदी सरकारचे शहरी विकास मंत्रालय प्रयत्नात आहे. यासाठी संशोधन करण्यात येत आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. अशा मेट्रो पॅरिससह अनेक शहरांमध्ये सुरू आहे.
सर्व शहरे मेट्रो सेवेची मागणी करताहेत
हरदीप सिंह यांनी वाढत्या शहरीकरणामुळे मेट्रो रेल्वेची मागणी वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागांचे सतत शहरीकरण होत आहे. शहर बनल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि अधिक चांगल्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था आवश्यक असते. दिल्लीमध्ये मेट्रो सुविधा प्रचंड यशस्वी झाली. यानंतर अनेक शहरांमधून मेट्रो रेल्वेची मागणी होऊ लागली. मात्र, सर्व ठिकाणी मेट्रोची सेवा देणे सहजसोपे नाही. मेट्रो महागडी असणे हे याचे मुख्य कारण आहे. यावर उपाय शोधण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेट्रोचे एक किलोमीटर लांबीचे नेटवर्क तयार करण्यासाठी 400 कोटी रुपये इतका प्रचंड खर्च येतो.
हेही वाचा -मध्यप्रदेश : ८० वर्षीय आदिवासी महिलेच्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन