नुआपाडा - गावात रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गर्भवतीने वाटेतच बाळाला जन्म दिला. ही घटना ओडिशा राज्यातील नुआपाडा जिल्ह्यात घडली. याप्रकरणात वेळीच योग्य पाऊले उचलण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे, प्रशासनावर टीका केली जात आहे.
गावात रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता नाही; गर्भवतीने वाटेतच बाळाला दिला जन्म - नुआपाडा
पहाटे खाटावर ठेऊन ४ किलोमीटर लांब असलेल्या रुग्णालयात प्रमिलाला नेण्यात येत होते. परंतु, प्रमिलाने रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच बाळाला जन्म दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश माझी याची पत्नी प्रमिला माझीला सोमवारी रात्रीपासून प्रसुतीकळा येत होत्या. परंतु, अंधारात डोंगराळ भागातून जाणे शक्य नसल्याने पहाटे रुग्णालयात जाण्याचे ठरले. पहाटे खाटावर ठेऊन ४ किलोमीटर लांब असलेल्या रुग्णालयात प्रमिलाला नेण्यात येत होते. परंतु, प्रमिलाने रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच बाळाला जन्म दिला. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे.
समदापाडा गाव डोंगराळ भागात आहे. गावात पोहोचण्यासाठी कोणताही डांबरी रस्ता नाही. येथे जीवनाश्यक वस्तूंचीही कमतरता आहे. या ठिकाणी रात्री गावाच्या बाहेर जाण्यासाठी डोंगराळ भागात असलेल्या कच्या रस्त्यावरुन जावे लागते. जिल्हा प्रशासनाने गावात कोणतीही व्यवस्था केलेली नाही. गावापासून रुग्णालय ४ किलोमीटर लांब आहे. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत गावातून रुग्णालयात जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही.