नवी दिल्ली -चीनच्या जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित कृतीमुळे लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात हिंसाचार झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या हालचाली नियंत्रण रेषेच्या आतमध्येच होत्या. मात्र, चीनने एकट्यानेच सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
गलवान व्हॅली परिसरात झालेल्या झटापटीनंतर एकही भारतीय सैनिक बैपत्ता झाला नाही. सीमा व्यवस्थापनात भारत जबाबदारपणे वागत असून भारताच्या सर्वकाही कृती सीमेच्या आतच आहेत. चीननेही त्यांच्या भूमीतच हालचाली कराव्यात. दोन्ही देशांचे दुतावास कार्यालये, परराष्ट्र मंत्रालये आणि सीमेवरील अधिकारी संपर्कात आहेत, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.