महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपचा बंदुकधारी आमदार करणार 'या' पक्षात प्रवेश - expelled

उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार प्रणव सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.सध्या ते बसपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रणव सिंह

By

Published : Jul 12, 2019, 9:45 PM IST

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार प्रणव सिंह यांचा हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कारनाम्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून ते आता बसपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.


'लांबा लांबा घूंघट काहे को डाला ...' या गाण्यावर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी डान्स केला होता. यावेळी त्यांच्या हातात दारुचा ग्लास आणि बंदुका आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत नाचताना पाहायला मिळत आहेत.


एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर जूनमध्ये तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details