नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याची प्रकृती सतत खालावत आहे. फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुखर्जी कोमात असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली, व्हेंटिलेटर सपोर्ट कायम - प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुखर्जी कोमात असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 10 ऑगस्टला प्रणव मुखर्जी यांना श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. यासह त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे.
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांनी 2012 त 2017 दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. जवळपास 5 दशक भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.