मध्यप्रदेश - भोपाळच्या खासदार खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सिहौर येथे कार्यकर्ता भेटीदरम्यान त्यांनी 'आपली निवड शौचालय स्वच्छ करण्यासाठी केलेली नाही', असे विधान केले आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर या म्हटल्या की, "आम्हाला नालेसफाई, शौचालय सफाई यासाठी खासदार म्हणून निवडण्यात आलेले नाही. मात्र, ज्या कार्यासाठी आमची निवड झाली आहे, ते कार्य आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत."
मी शौचालय स्वच्छ करण्यासाठी खासदार झाले नाही; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान - pragya thakur controversial comment
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला शौचालय स्वच्छ करण्यासाठी खासदार म्हणून निवडून दिलेले नाही, असे धक्कादायक विधान प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या आधीही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी महात्मा गांधी यांच्या मारेकरी नथुराम गोडसे यांचा देशभक्त म्हणून उल्लेख केला होता. दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांचे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेविषयी जागरुकता पसरवत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि हेमा मालिनी यांनी संसदेच्या परिसरात झाडू साफई केली होती. परंतु, प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे.