महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रवादी पुन्हा..! सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ असलेल्या लक्षद्वीपमध्ये मंहमद फैजल विजयी - सईद

राज्यात आघाडी केलेल्या NCP ने लक्षद्वीपमध्ये मात्र काँग्रेसला शह देत २०१४ मध्ये पहिल्यांदाच आपला झेंडा या बेटावर रोवला होता. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

लक्षद्वीपमध्ये मंहमद फैजल विजयी

By

Published : May 23, 2019, 5:40 PM IST

लक्षद्वीप - एकेकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला आणि देशातली सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ असलेल्या लक्षद्विपमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीमध्येच चुरशीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मंहमद फैजल पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. फैजल यांनी काँग्रेसचे उमेदवार मुहम्मद हमदुल्ला सईद यांचा पराभव करून आपले गड राखण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादीच्या फैजल यांना यावेळी एकूण २२ हजार ७९६ इतकी मते पडली. तर काँग्रेसचे उमेदवार सईद यांना २१ हजार ९८० एवढी मते मिळाली. तर भाजप उमेदवार अब्दूल हाजी यांना केवळ १०३ मते मिळाली.

केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप या लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी १७ व्या लोकसभेसाठी एकूण ६६ टक्के मतदान झाले होते. मागच्या वेळेप्रमाणे राष्ट्रवादीने यावेळीही या द्वीप समुहावर घड्याळ्याची टिकटिक कायम राखली आहे.

राज्यात आघाडी केलेल्या NCP ने लक्षद्वीपमध्ये मात्र काँग्रेसला शह देत २०१४ मध्ये पहिल्यांदाच आपला झेंडा या बेटावर रोवला होता. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा संधी दिली होती. काँग्रेसनेही फैजल यांच्या विरोधात मुहम्मद हमदुल्ला सईद यांना रणांगणात उतरवले होते. तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने या ठिकाणी अद्बल खादेर यांना उमेदवारी जाहीर केली होती. भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून शरीफ खान, जनता दल (यूनाइटेड)चे मोहम्मद शादिक मैदानात होते. या मतदारसंघासाठी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ तारखेला मतदान पार पडले. यावेळी एकूण ५१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्य़ात आले. त्यामध्ये एकूण ४६८७७ एवढे मतदान झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details