मुंबई- अमेठीतून राहूल गांधी जर हारले, तर आपण राजकारण सोडू असे विधान काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केले होते. मात्र, राहुल गांधीच्या अमेठीतील पराभवामुळे आता सिद्धूंना अनेकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता पंजाबच्या मोहाली आणि लुधियानातील पखवाल रोडवर मधील काही पोस्टर लावत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
राजकारण कधी सोडताय? राजीनाम्याची वाट पाहतोय, पोस्टरमधून सिद्धूंना टोला - rahul gandhi
लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या स्मृती इराणी निवडणूक लढवत होत्या. याच दरम्यान राहुल गांधींच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत ते जर अमेठीतून निवडून आले नाही तर मी राजकारण सोडेल, असे विधान सिद्धू यांनी केले होते.
सिद्धूंच्या छायाचित्रांसह हे पोस्टर लावण्यात आले आहेत. तुम्ही राजकारण कधी सोडत आहात? दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली आहे. आम्ही तुमच्या राजीनाम्याची वाट पाहत आहोत, असा आशय या पोस्टरवर लिहिलेला पाहायला मिळत आहे.
काय आहे प्रकरण -
लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या स्मृती इराणी निवडणूक लढवत होत्या. याच दरम्यान स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना सिद्धू यांनी राहुल गांधींच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत ते जर अमेठीतून निवडून आले नाही तर मी राजकारण सोडेल, असे विधान केले होते. मात्र, अमेठीतून स्मृती इराणींनी राहूल गांधींचा ५० हजारहून जास्त मतांनी पराभव केल्याने सिद्धूंना अनेकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे.