महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पूर्वा एक्सप्रेस अपघात : NDRF तर्फे वेगाने बचावकार्य सुरू, लष्करही मदतीला - derail

पूर्वा एक्स्प्रेसचे पाच एसी डब्यांसह एकूण ११ डबे कानपूर जवळच्या रुमा आणि चकेरी गावालगतच्या महाराजपूर येथे रुळांवरून घसरले. यातील ४ डबे उलटले.  सुदैवाने अपघातात कोणीही मृत झालेले नाही. मात्र, अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

पूर्वा एक्सप्रेस अपघात

By

Published : Apr 20, 2019, 8:20 AM IST

Updated : Apr 20, 2019, 8:27 AM IST

कानपूर - पूर्वा एक्सप्रेसचे पाच एसी डब्यांसह एकूण ११ डबे कानपूर जवळच्या रुमा आणि चकेरी गावालगत रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर बचावकार्य वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ जवानांच्या पथकाद्वारे बचावकार्य सुरू आहे. लष्करही बचाव कार्यात सहभागी आहे.

पूर्वा एक्स्प्रेसचे पाच एसी डब्यांसह एकूण ११ डबे कानपूर जवळच्या रुमा आणि चकेरी गावालगतच्या महाराजपूर येथे रुळांवरून घसरले. यातील ४ डबे उलटले. सुदैवाने अपघातात कोणीही मृत झालेले नाही. मात्र, अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे डीआरएम अमिताभ यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची चौकशी केली. एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी येथे पोहोचत बचावकार्यास सुरुवात केली. घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. यूपी एटीएसचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

Last Updated : Apr 20, 2019, 8:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details