महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक  : अंतिम टप्प्यासाठी आज मतदान

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार १०.०१ लाख मतदार हे ९१८ उमेदवारांचे भाग्य निश्चित करणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

अंतिम टप्प्यासाठी मतदान

By

Published : May 19, 2019, 1:46 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकिच्या सातव्या व अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. देशातील सात राज्यात तसेच एका केंद्रशासित प्रदेशात रविवारी मतदान होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ९१७ उमेदवार हे सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ५९ जागांवर लढत देत आहेत. नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीस उभे आहेत. मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय तसेच समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव हे निवडणुक लढवत आहेत.

शेवटच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहार आणि मध्य प्रदेशात आठ, हिमाचल प्रदेशमध्ये चार, झारखंडमध्ये तीन तर चंदिगढ येथील एका जागेवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार १०.०१ लाख मतदार हे ९१८ उमेदवारांचे भाग्य निश्चित करणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सातव्या टप्प्यातील काही प्रमुख उमेदवार :

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, त्यांची पत्नी व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग बादल यांची पत्नी प्रणीत कौर, पंजाबमध्ये अभिनेता सनी देओल (भाजप), सोम प्रकाश, गोरखपूर येथून रवि किशन (भाजप), पाटणा साहिबमधून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (काँग्रेस), मंदसौरमधून मीनाक्षी नटराजन, हिमाचल प्रदेशमधून भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, चंदीगडमध्ये माजी केंद्रीय मंत्री पी. के. बंसल, भाजपच्या खासदार किरण खेर.

ABOUT THE AUTHOR

...view details