पाटणा- बिहारच्या बंका जिल्ह्यात दिवसाढवळ्या खुनाची घटना घडली आहे. अज्ञातांनी पोलिसाच्या ३० वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बिहारमध्ये पोलिसाच्या मुलाची गोळी झाडून हत्या; कारण अस्पष्ट - बिहार हत्या
शहरातील भूषणा पुलावर अचानक त्यांच्यावर गोळीबार केला, असे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गोळीबार केल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळाहून पळ काढला.
बिहारमध्ये पोलिसाच्या मुलाची गोळी झाडून हत्या; कारण अस्पष्ट
मंगरू यादव स्थानिक पोलीस ठाण्याकडे जात असताना अज्ञात लोकांनी त्यांना घेराव घातला. शहरातील भूषणा पुलावर अचानक त्यांच्यावर गोळीबार केला, असे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गोळीबार केल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळाहून पळ काढला.
मंगरू हे लखन यादव यांचे पुत्र होते. लखन यांची जिल्ह्यातील सुय्या परिसरातील पोलीस ठाण्यात नुकतीच नियुक्ती झाली होती. सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रमुख देवेंद्र राय यांनी दिली.