पाटणा- सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मात्र, या काळातही अनेक लोक काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस आपल्या सेवेसाठी रस्त्यावर झटत आहेत. बिहारच्या रोहतास येथील सासाराम येथेही अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या ११ महिन्याच्या बाळाला घेऊन एक महिला पोलीस कर्तव्य बजावत आहे. या पोलीस महिलेच सर्वत्र कौतुक होत आहे.
ऑन ड्युटी..! ११ महिन्याच्या बाळाला घेऊन महिला पोलीस बजावते कर्तव्य - बिहार कोरोना अपडेट्स
संचारबंदीमुळे सगळे घरात बसून आहेत. मात्र, ही महिला बाळाला घेऊन काम करत आहे. महिलेच्या उत्साहामुळे अनेक जण प्रेरित होत आहेत. एकीकडे घरातील काम करायचे आणि दुसरीकडे नोकरी करायची, अशी दुहेरी भूमिका सध्या ही महिला पार पाडत आहे.

सदर महिलेचे नाव पूजा कुमारी असून त्या बिहार पोलीसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. दररोज बारा तास ड्यूटी असते. इतका वेळ बाळ एकटे राहू शकत नाही. त्यामुळे बाळाला सोबत ठेवूनच काम करावे लागत असल्याचे पुजा यांनी सांगितले. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वजण घरातच बसून आहेत. अशा परिस्थितीत पुजा आपल्या बाळाला घेऊन रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडत आहे. हेच लोक खरे कोरोना योद्धा आहेत.