दिल्लीत पोलीस उपनिरीक्षकाची समाजकंटकांकडून हत्या - miscreants
या पोलिसाने वादावादी झालेल्या ठिकाणी काही गुन्हेगारांचा व्हिडिओ तयार केल्याने वादावादी सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - विवेक विहार येथील कस्तुरबा नगर परिसरात रविवारी रात्री एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली. राज कुमार असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. काही समाजकंटकांशी झालेल्या जोरदार हाणामारीनंतर त्यांना जीव गमवावा लागल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
'राज कुमार हे रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी चालत निघाले होते. त्या वेळी त्यांचा काही गुंडांशी सामना झाला. या परिसरात बेकायदा दारूचा व्यवसाय करणारे लोक राहतात. त्यामुळे पोलिसांनी या भागात कायमची गस्त ठेवली होती. यावरून हा संघर्ष सुरू झाला,' असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
या पोलिसाने वादावादी झालेल्या ठिकाणी काही गुन्हेगारांचा व्हिडिओ तयार केल्याने वादावादी सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.