दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱया विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनीवारी दिल्लीतील मोती नगर येथे केजरीवाल यांची रॅली सुरू असताना सुरेश या व्यक्तीने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली होती.
केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल - दाखल
रॅली सुरू असताना केजरीवाल जिपमध्ये उभे राहून हातवारे करत होते. त्यावेळी लाल टी-शर्टमध्ये एक व्यक्ती अचानक त्यांच्या गाडीवर चढली. काही समजण्यापूर्वीच त्याने केजरीवाल यांना मारले होते.
केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
रॅली सुरू असताना केजरीवाल जिपमध्ये उभे राहून हातवारे करत होते. त्यावेळी लाल टी-शर्टमध्ये एक व्यक्ती अचानक त्यांच्या गाडीवर चढली. काही समजण्यापूर्वीच त्याने केजरीवाल यांना मारले. त्यावेळी केजरीवाल यांचा तोलही गेला होता. मात्र, कार्यकर्त्यांनी सावरल्याने पडण्यापासून वाचले.
आरोपी हा कैलाश पार्क परिसरातील रहिवाशी असून सुरेश, असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक करुन मोतीनगर येथील पोलीस ठाण्यात आणले होते. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.