उदयपूर- कोरोनासोबतची लढाई जिंकण्यााठी पोलीस, डॉक्टरांसह अनेक कोरोना वॉरियर्स प्रयत्न करत आहेत. जनतेच्या सेवेसोबतच ते नागरिकांना जागरुक करण्याचे कामदेखील करत आहेत. नुकतेच उदयपूरच्या झाडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र सिंह राव यांनी गाणे गात लोकांना कोरोनाबाबत जनजागृती केली. त्यांचे गाणे ऐकून लोकही आपल्या घराच्या छतावर जाऊन टाळ्या वाजवू लागले आणि त्यांचे आभार मानले.
पोलिसाचा अनोखा उपक्रम, गाणे गात कोरोनाबाबत जनजागृती - Udaipur news
जयपुर के कोरोना वॉरियर्स के 'साथी हाथ बढ़ाना' गाने के बाद उदयपुर के झाड़ोल के थानाधिकारी का वीडियो सामने आया है. जिसमें वे गाना गाकर लोगों को कोरोना के प्रति जागरूक कर रहे हैं. साथ ही उन्होंने गाने के माध्यम से लोगों की हौसला अफजाई भी की.
गाणे गात केली जनजागृती
झाडोल ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी हे गाणे स्वतःच तयार केले. कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा उद्देश आहे. शहरातील विविध ठिकाणी जाऊन ते हे गीत गात आहेत. यासोबतच ते या गीतातून सर्वांना आपल्या घरात राहण्याची विनंती करत आहेत. याशिवाय लोकांना कोरोनापासून बचावासाठीच्या उपाययोजनांसंदर्भातही माहिती देत आहेत. त्यांचे गाण्याला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.