नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी 'आप'चे नगरसेवक ताहिर हुसेनला ताब्यात घेतले आहे. पोलीस आता ताहिर हुसेनबरोबरच त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहे. दिल्ली गुन्हे शाखा नातेवाईकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराच्या आरोपनंतर आप पक्षाने त्याच्यावर निलंबणाची कारवाई केली आहे.
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी ताहिर हुसेनच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांचीही चौकशी - दिल्ली हिंसाचार बातमी
दिल्लीत हिंसाचार पसरवण्याचा आरोप ताहिर हुसेनवर आहे. याबरोबरच गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा याच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचारनंतर पोलिसांना त्याच्या घरावर घरावर पेट्रोल बॉम्ब सापडले होते.
दिल्लीत हिंसाचार पसरवण्याचा आरोप ताहिर हुसेनवर आहे. याबरोबरच गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा याच्या हत्येचा आरोप हुसेनवर आहे. हिंसाचारनंतर पोलिसांना ताहिर हुसेन याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले होते. त्यानंतर काही दिवस तो फरार होता. मात्र, नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीदरम्यान हुसेन याच्या काही नातेवाईकांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. सोमवारी हुसेन याचा भाऊ शाह आलम यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यासंबधीचे कॉल रेकॉर्डिंग पोलीस तपासत आहेत. दंगल सुरू होती त्या काळात ताहिरने विविध लोकांशी केलेले संभाषण पोलीस तपासत आहेत.