हैदराबाद - पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे ठार केले. या प्रकरणी पोलीस आयुक्त व्ही. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेतली. आरोपींना घटनास्थळी नेले असता घटनाक्रम कसा घडला याची माहिती पोलीस आयुक्तांनी माध्यमांना दिली.
पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद - police commissioner v c sajjanar
#HyderabadEncounter: पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची पत्रकार परिषद
पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार
पत्रकार परिषदेत आयुक्तांनी सांगितलेली ठळक माहिती
- पीडितेच्या मृत्यूनंतर ३० नोव्हेंबरला चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. सर्व आरोपी तेलंगणातील नारायणपेठ या जिल्ह्यातील आहेत.
- अटक करण्यात आल्यानंतर आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
- पोलीस कोठडीदरम्यान गुन्हा कसा घडला याची उकल पोलीस अधिकारी करत होते.
- तपासामध्ये गुन्ह्यासंबधित वस्तू जप्त करण्यासाठी पहाटे ५.४५ च्या दरम्यान आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. पीडितेचा मोबाईल, पावर बँक या वस्तू आरोपींनी तेथेच लपवल्या होत्या. त्या जप्त करायच्या होत्या. तसेच गुन्हा कसा घडला याची माहिती घेण्यात येत होती.
- त्यावेळी आरोपींनी दगड आणि तीक्ष्ण वस्तूंनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या दोन बंदुकाही आरोपींनी हिसकावून घेतल्या. गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
- आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी, एका पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला जखम झाली आहे.
- पोलिसांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला.
- पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा हे आरोपी ठार झाले.
- आरोपींचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवणार
- पोलिसांना कारवाई करताना गोळी लागली नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
- आरोपींनी याआधी अशाप्रकारचे गुन्हे कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये केले आहेत का? याचाही पोलिसांकडून तपास सुरू होता. आरोपींचे डीएनए चाचणीही करण्यात आली होती. तसचे वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते.
- पीडितेच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका, असे आवाहन आयुक्तांनी माध्यम प्रतिनिधींना केले
Last Updated : Dec 6, 2019, 5:44 PM IST