महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सहा वर्षाच्या मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; वर्गातल्याच मुलीबरोबर केले गैरकृत्य - हरियाणा मुलीवर अत्याचार

हरियाणा राज्यात लैंगिक अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या मुलावर वर्गातील मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Aug 31, 2019, 12:00 PM IST

चंदीगड - हरियाणा राज्यात लैंगिक अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या मुलावर वर्गातील मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या लहानगीबरोबर असभ्य वर्तन करणारा मुलगा सहा वर्षांचा आहे. मुलगा वयाने लहान असल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीबरोबर लैंगिक कृत्य करणार मुलगा सिरसा येथे राहणारा आहे, असे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले आहे. दोन्ही लहानगे सरकारी शाळेमध्ये शिकतात. मुलीने काही दिवसांपूर्वी आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले होते.

सहा वर्षाच्या मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

हेही वाचा - सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास आई-वडिलांचा नकार

मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुढे आली घटना

पोटात दुखत असल्यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तपासणीमध्ये ही बाब समोर आली. याबाबत मुलीला विश्वासात घेवून विचारण्यात आले असता एक मुलगा स्वच्छतागृहात घेवून गेल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा - भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणारी बेपत्ता तरुणी राजस्थानमध्ये सापडली

पोलिसही हवालदिल

पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलगी बरी झाल्यानंतर मुलाची ओळख पटवण्यात येणार आहे. मात्र, ७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला अटक करता येत नाही, त्यामुळे पोलीसांनाही काय करावे हा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा - अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details