मुरादाबाद(उत्तर प्रदेश) - आरोग्य विभाग आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी ७ महिलांसमवेत १८ लोकांना अटक केली आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. याशिवाय सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे आणि लोकांनी बनविलेले व्हिडिओ तसेच फोटोंच्या आधारावर ४० लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल.
मुरादाबादमध्ये पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली, १८ जणांना अटक - नाबाबपुरा में कोरोना संक्रमित व्यक्ति की मौत
१३ एप्रिलला नागफनी परिसरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस मृताच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यासाठी गेली होती. त्या कुटुंबांना रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरू केली.
१३ एप्रिलला नागफनी परिसरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस मृताच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यासाठी गेली होती. त्या कुटुंबांना रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरू केली. यामध्ये एक डॉक्टर गंभीर जखमी झाले.
या संपूर्ण घटनेवर पोलीस अधिकारी अमित कुमार आनंद यांनी सांगितले, की दगडफेकीनतंर पोलिसांनी व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे ७ महिलांसमवेत १७ जणांचा अटक केली. १७ एप्रिलला अजून एका व्यक्तीला अटक केली. या प्रकरणात दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. या सर्वांच्या अटकेसाठी ७ टीम बनवण्यात आल्या असून लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल.